बीड शहरात 6 ठिकाणी संचारबंदी लागू

बीड, अंबाजोगाई, गेवराई शहरासह जिल्ह्यातील १६ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित

बीड, दि, २७::- जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे बीड शहरात ६, अंबाजोगाई शहर मधील ३, गेवराई शहरातील ३ तसेच बीड, परळी व माजलगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.

याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे .

बीड शहरातील शनी मंदिर , टिळक रोड (बलभीम चौक) , धनराज कॉलनी (पालवन चौक) , रिपोर्टर रोड (जुन्या एस पी ऑफिस जवळ) , गजानन नगर नाळवंडी नाका,विप्र नगर , अंबाजोगाई शहरातील हनुमान मळा जोगाईवाडी, अनुराग कॉलनी परळी रोड व हौसिंग सोसायटी भाग -2, गेवराई शहरामध्ये मोमीनपुरा, माऊली नगर, बेंद्रे गल्ली या शहरातील ठिकाणी तसेच,
बीड तालुक्यातील नेकनुर हमीदनगर (एस. एस. कॉम्प्लेक्स), परळी तालुक्यातील टोकवाडी,
आणि माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण व नवीन वसाहत भाटवडगाव येथे या गावात व वरील संबंधित परिसरात कंटेनमेंट झोन ( Containment Zone) घोषित करण्यात आले आहे असे आदेशात नमूद केले आहे.

तसेच सर्व संबंधित ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहेत.

राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै २०२० रोजीच्या रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!