मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे। गेल्या २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे.

त्यामुळे आता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

२६ जुलैला कोकण व गोव्यात बहुतांश ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
२७ जुलैला कोकण व गोव्यात बहुतांश तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २८ जुलैला कोकण व गोव्यात बहुतांश, विदर्भात बऱ्याच तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच २८ जुलैला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. पुण्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे.

तर मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच अधून मधून जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. असा देखील अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!