आजच्या अहवालात बीड जिल्ह्यात पुन्हा 25 पॉझिटिव्ह

आज पाठवण्यात आलेल्या अहवालात जिल्ह्यात 25 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत बीडमध्ये 6 तर परळीत 12 रुग्ण आहेत

गेल्या 24 तासात आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात 44 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत पहिल्या अहवालात 37 तर दुसऱ्या अहवालात 7 रुग्ण आहेत यात बीड शहरात 21 रुग्ण आढळले आहेत,कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 507 झाली असून 263 रुग्ण सध्या उपचारासाठी दाखल आहेत यातील काही रुग्ण बाहेर गावी उपचारासाठी रवाना झाले आहेत

बीड जिल्ह्यात कोरोनाचे मीटर दिवसेंदिवस वाढत आहे,बाधीत रुग्णाच्या संपर्कात येणारेच लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत,आधी हे प्रमाण निव्वळच नव्हते बाहेर गावातून आलेले रुग्ण पॉझिटिव्ह आढळत होते मात्र हा प्रसार पुढे वाढून आता शहरात आणि ग्रामीण भागातही झाला आहे,जवळपास बीड जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कोरोनाची मजल गेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!