गेवराईच्या कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू
बीडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोरोना वार्डामध्ये उपचार घेत असलेल्या एका 68 वर्षीय महिलेचा उपचार घेताना आज बुधवारी सकाळी मृत्यू झाला आहे. गेवराई शहरातील गजानन नगर भागातील या महिलेला काही दिवसापूर्वीच उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेला श्वसनाचा त्रास होत होता तिची प्रकृतीही चिंताजनक झाली होती. बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यु झालेल्या जिल्ह्यातील रुग्ण संख्या 20 वर पोहचली आहे