अंत्यविधी केलेल्या वृद्धाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह:तर तहसील मधील पेशकार यांचाही मृत्यू

गेवराई तालुक्यातील एका वृद्ध महिलेचा उपचार चालू असताना मृत्यु झाल्याची घटना ताजी असताना बागपिंपळगाव येथील एका ७० वर्षीय वृद्ध याचे आरोग्य प्रशासनाने स्वॅब घेतले होते. दुर्दैवाने रात्री त्याचा मृत्यू झाला. सदरील वृद्धास संशयित म्हणून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा स्वॅब घेण्यात आलेला असताना त्याला घरी आणण्यात आले होते. यानंतर सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा म्हणजे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास तो पॉझिटिव्ह आल्याची माहिती बीड येथून त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. तोपर्यंत सदरील वृद्धाच्या पार्थीव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या वेळी त्याच्या अंत्यविधीला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नातेवाई उपस्थित होते. तो पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून गेवराई शहरात अन्य एका निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सदरचा व्यक्ती हा गेवराई तहसीलमध्ये पेशकार म्हणून काम करत होते. त्यांचा कुठल्या आजाराने मृत्यू झाला याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली तरी एकामागे एक तीन घटनांनी शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!