बिनखर्चिक उपाय तुम्हाला जीवनदान देऊ शकतात

संधी म्हणून पाहा,सकारात्मक राहा

जेष्ठ पत्रकारअशोक देशमुख

गेले तीन महिने झाले सारे जग एका न दिसणाऱ्या आणि मृत जिवाणूंमुळे त्रस्त आहे. अमेरिका ,इटली आदि बलाढ्य देशांनीही या विषाणूपुढे गुढघे टेकले आहेत. ज्या चीनमधून कोरोनाची सुरूवात झाली तेथेही अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. इतर देशांत लागण सुरू होताच भारताने प्रतिबंधक उपाय योजण्यास सुरूवात केली . हवेतून या विषाणूचा संसर्ग होत नाही तर स्पर्शातून होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या आजाराची लागण झालेल्या माणसाला समाजापासून बाजूला ठेवतात आणि काही साधल्या उपचारांमुळे तो बरा होतो. या आजाराची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी सारखा उपाय तालीमच आहे. परंतु त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांची रोजीरोटी बंद होते
कोरोनाची लागण झाल्यानंतर सरकारने आणि समाजातील दानशुरांनी मोठ्याप्रमाणात मदत करून अनेकांच्या भाकरीचा प्रश्र्न सोडवला. मात्र खरा त्रास सुरू झाला तो अनलाॅकच्या काळात तब्बल तीन महिने व्यापार उदीम बंद‌
पडल्यामुळे रोख पैसा हाती राहिला नाही. परिणामी रोजच्या व्यवहाराचीही पंचाईत निर्माण झाली. अशाप्रकारच्या साथरोगाचे वैशिष्ट्य असे की प्रारंभी असलेले गांभिर्य काही कालावधी नंतर संपते.आणि व्यवहार सुरू होतो. साथरोगापासून रोगांचा बचाव करण्यासाठी सरकार हरतह्रेने प्रयत्न करते. परंतु समाजातील एक गट याकडे संधी म्हणून पाहात असतो. पीपीकिट ,सॅनिटायजर, औषधी यांच्या किमती आकाशाला भिडतात. मध्यंतरी होमिओपॅथी औषधांचा वापर सुरू झाला. दहा रूपयांच्या गोळ्या पन्नास रूपयांचा विकून औषधी कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांची कमाई केली. आपल्याकडील मालाचा खप व्हावा यासाठी समाजामध्ये भीती निर्माण केली आणि धंद्यास सरकत आणली. भारतातील आयुर्वेद शास्त्र जगातील सर्वात प्राचीन शास्त्रज्ञ आहे. त्यात हळद,मिरे,गूळ यांचे महत्व विषद केले आहे. आज जगभर वाफ घेणे, हळद गुळाच्या गरम दुधाचे सेवन, आयुर्वेदिक काढे आणि गरम पाण्याचे सेवन हे उपाय प्रभावी ठरले आहेत. कोणत्याही रुग्णालयात ही उपचारपद्धती वापरली जाते. विशेष म्हणजे या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे
शंभरी पार केलेली माणसेही दुरुस्त झालेल्यांची उदाहरणे आहेत. विविध आजारांनी ग्रस्त आणि मानसिक दृष्ट्या खचलेली माणसे केवळ भीतीने मरण पावतात. काहीजणांनी काॅरन्टाईनला कंटाळून आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. समाजात निर्माण करून ठेवलेल्या भीतीमुळे माणूस माणूसकीची विसरत चालला आहे. ज्या कुटुंबात कोरोनाग्रस्त रुग्ण असतो त्या कुटुंबावर अघोषित बहिष्कार टाकला जातो. काॅरंटाईन झालेल्या माणसाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही. या आजाराची भीती बाळगण्याऐवजी सकारात्मकता वाढवली पाहिजे आणि आपली प्राचीन उपचारपद्धतीचा अवलंब केला पाहिजे. तुझे आहे तुजपाशी पण जागा चुकवावी अशी आपली अवस्था झाली आहे. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करा आणि कोरोनाला दूर ठेवा हाच मूलमंत्र महत्त्वाचा आहे.पूर्वी प्रसुती घरीच होत असे. पराभूत झालेल्या महिलेस दीड महिना अंधाऱ्या खोलीत ठेवले जात असे हे विलगीकरणच होते. बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुण्याची पध्दत होती तिचा आपल्याला विसर पडला होता. आता या सवयींचा पुन्हा अंगीकार करावा लागेल. योग करो तंदुरुस्त रहो हे त्यासाठीच सांगितले आहे. हे बिनखर्चिक उपाय तुम्हाला जीवनदान देऊ शकतात. मग भीती निर्माण करण्यापेक्षा सकारात्मकता निर्माण करूयात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!