ग्राहकांसाठी कर्जमंजुरी होणार अतिसुलभ

बॅंकांच्या संघटनेकडून “इज ऑफ बॅंकिंग’ योजना

नवी दिल्ली  -बॅंकांमध्ये कर्ज घेताना अनेक अडचणी येतात याची जाणीव बॅंकांना आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत इज ऑफ बॅंकिंग संकल्पना राबविण्यात येत असल्याचे बॅंकांच्या संघटनेने म्हटले आहे.

इंडियन बॅंक असोसिएशन या संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता यांनी ही माहिती दिली. कर्ज वितरण क्षेत्रात सुधारणा करण्यास बराच वाव आहे, याची आम्हाला जाणीव आहे. ग्राहकांना कर्ज घेताना गुंतागुंतीच्या सामना करण्याची गरज पडू नये. यासाठी ही प्रक्रिया जलद आणि सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

ग्राहक व कर्मचाऱ्यांदरम्यान व्यवहार होताना काही अडचणी येऊ शकतात. यासाठी या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त डिजिटायझेशन करून कर्मचाऱ्याचा आणि ग्राहकांचा संबंध कमी करण्यावर विचार करण्यात येत आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बॅंकांनी सामूहिकपणे इज ऑफ बॅंकिंग या विषयावर काम करणे सुरू केले आहे. ग्राहकांचा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. सहा महिन्यांनंतर बऱ्याच बॅंकांमध्ये डिजिटल लेंडिंग उत्पादने उपलब्ध होतील. त्यामुळे बॅंकिंग व्यवहार करणे पूर्वीपेक्षा अधिक सुलभ होणार आहे.

59 मिनिटांमध्ये कर्ज मंजूर करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे पोर्टल आहे. या अनुभवाच्या आधारावर इतर कर्ज उत्पादने उपलब्ध केली जाऊ शकतात. पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत अशी डिजिटल प्रक्रिया विकसित करण्याचा प्रयत्न आहे.सध्या बॅंकांच्या इतर व्यवहारांमध्ये डिजिटायझेशनचा वापर केला जात आहे. त्यामुळे एका क्‍लिकवर बरीच कामे होत आहेत.

गेल्या दहा वर्षांमध्ये बॅंकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेला आहे. ग्रामीण भागातील जनतेला अधिक चांगल्या सुविधा देण्याचा आगामी काळात प्रयत्न केला जाणार आहे.

कर्ज फेररचना हवी
विमान वाहतूक, हॉटेल, पर्यटन क्षेत्रावर करोनाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्जाचा हप्ता पुढे ढकलून भागणार नाही. यासाठी या कंपन्यांच्या कर्जाची फेररचना करण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून काय करता येईल यासंदर्भात चर्चा चालू आहे. या संदर्भात रिझर्व्ह बॅंकही विचार करीत आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता असल्याचे आयबीएच्या पदाधिकाऱ्यांनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!