बीड शहरातील या भागाची संचारबंदी शिथिल: जिल्हाधिकारी रेखावार यांचे आदेश
बीड
बीड शहरातील विप्र नगर बामणवाडी येथील एक रुग्ण औरंगाबाद येथील डॉ हेडगेवार हॉस्पिटल या ठिकाणी आढळून आल्यानंतर या भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती या 14 दिवसात या भागात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्यामुळे आज विप्रनगर भागातील संचारबंदी शिथिल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत