मोबाईल चार्जिंग करताना केलेल्या चुकांमुळे नुकसानच

मोबाइल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दिवसातील बराचसा वेळ आपण मोबाइलवर काही ना करण्यासाठी घालवत असतो. त्यामुळे आपल्या फोनची बॅटरी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यामुळं बॅटरी दीर्घकाळ टिकणं खुप गरजेचं असतं, परंतु काहीजण चुकीच्या पद्धतीने स्मार्टफोन चार्जिंगला लावतात. ज्यामुळे बॅटरीचं बरंचस नुकसान होतं. स्मार्टफोन चार्जिंगला लावताना कोणती काळजी घ्यायला हवी, यासंबंधी काही महत्त्वाच्या टिप्स खाली दिल्या आहेत.

मोबाइल रात्रभर चार्जिंगला लावू नका

काही लोकांना फोन रात्रभर चार्जिंगला लावून झोपण्याची सवय असते. परंतु यामुळे त्यांच्या फोनचे किती नुकसान होत आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही.
कारण खूप वेळ फोन चार्जिंगला लावल्यामुळे बॅटरी जास्तीची चार्जिंग होते आणि बॅटरी फुटूही शकते. शिवाय फोनच्या परफॉर्मन्सवर देखील परिणाम होतो.

बनावट किंवा दुसऱ्या फोनच्या चार्जरने चार्जिंग करू नका

सर्वप्रथमः हे जाणून घेणं गरजेचं आहे, की कोणतीही कंपनी आपल्या प्रत्येक फोनसाठी एक विशेष चार्जर बनवत असते. बऱ्याचदा लोकं आपल्या मूळ चार्जरऐवजी कोणत्याही मिळेल त्या चार्जरने फोन चार्ज करतात. तुम्ही असं करत असाल तर सावध व्हा. कारण यामुळे तुमची बॅटरी आणि फोन दोन्हीचं नुकसान होऊ शकतं.

मोबाइलचा कव्हर काढून फोन चार्ज करा

असं पाहिलं जातं, की अनेकजण आपल्या मोबाइल कव्हरसह आपला फोन चार्जिंगला लावतात. यामुळे अनेकदा फोन गरम होण्याची भिती असते. फोन वेळेत चार्जिंगवरून काढला नाही, बॅटरी देखील फुटू शकते किंवा मोबाइल कव्हर प्लॅस्टिकचे असेल तर ते पगळू शकते. त्यामुळे फोन चार्जिंग करताना नेहमी मोबाइल कव्हर काढून चार्जिंग करावा.

पॉवर बँकने चार्जिंग करत असताना फोन वापरू नका

बर्‍याच वेळा लोकं वेळेअभावी त्यांचा फोन चार्ज करण्यासाठी पॉवर बँक वापरतात. तसेच फोन चार्जिंग होत असताना त्याचा वापरही करतात. तुमच्या अशा सवयीमुळे तुमच्या स्मार्टफोनची कार्यक्षमता आणि बॅटरी डिस्प्लेला हानी पोहचते. जर तुम्हीही असं करत असाल तर लवकरात लवकरत तुमची सवय बदला.


error: Content is protected !!