हजसाठी केवळ 1 हजार लोकांनाच परवानगी ; यात्रेसाठी सौदी अरेबियाने जारी केली नवी नियमावली

दुबई- सौदी अरेबियाने या वर्षी हज यात्रेसाठी नवी नियमावली जारी केली आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार फक्‍त 1 हजार लोकांनाच हजसाठी परवानगी दिली जाणार आहे.

हज यात्रेतील सहभागी लोकांना जमजम विहरीतील मुकद्दस (पवित्र) पाणी पिण्यास मुभा असणार आहे. मात्र हे पवित्र पाणी प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पॅक करून दिले जाईल. तसेच सैतानला मारण्यासाठी जमा करण्यात आलेले दगडांना सॅनिटायझर केले आहे.

मक्‍का येथे होणाऱ्या हज यात्रेसाठी दरवर्षी लाखो लोक एकत्र येतात. या वर्षी मात्र दुसऱ्या देशांतील नागरिकांसाठी हज यात्रेवर सौदी अरेबियाने निर्बंध आणले आहेत. जगातील इतर देशांतील नागरिकांना हजसाठी जाता येणार नसले तरी हज यात्रा मात्र प्रथेप्रमाणे सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!