कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर, रशियाला टाकलं मागे

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत आता भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वर्ल्डोमीटर वेबसाईटच्या आकडेवारीनुसार भारताने रशिला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ही झेप भारतीयांची चिंता वाढवणारी आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहेत, मात्र तितकसं यश अद्याप मिळालेलं दिसत नाही.
वर्ल्डोमीटर वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 95 हजार 396 आहे. तर रशियामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 81 हजार 251 एवढी आहे. मात्र भारताच्या तुलनेने रशियातील आजची कोरोनाबाधित रुग्णांची वाढलेली संख्या कमी आहे. आज रशियात 6 हजार 736 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या भारताच्या पुढे अमेरिका आणि ब्राझील हे दोन आहेत. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 29 लाखांच्या पुढे आहे, तर ब्राझीलमध्ये ही संख्या 15 लाखांहून अधिक आहे.
या आकडेवारीतील महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी बाब म्हणजे, ज्या अमेरिकेत कोरोना बाधितांचा आकडा 29 लाखांच्या पार गेला, तिथे आज एका दिवसात भारतापेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. अमेरिकेत आज 17 हजार 900 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर भारतात आज 21 हजार 492 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधित देश
अमेरिका- 29 लाख 53 हजार 670
ब्राझील- 15 लाख 78 हजार 376
भारत- 6 लाख 95 हजार 396
रशिया- 6 लाख 81 हजार 251—

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!