बीड जिल्ह्यात आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू


बीड
उस्मानाबाद जिल्ह्यातून अंबाजोगाई येथे आलेल्या एका तरुणाला काही दिवसापूर्वी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते या दरम्यान त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यात तो रुग्ण पॉझिटिव आढळला होता आज उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
अंबाजोगाई शहरातील आनंदनगर भागात आपल्या भावाकडे भूम तालुक्यातील गिरवली या गावातून एक तरुण काही दिवसापूर्वी आला होता त्याला त्रास होऊ लागल्यामुळे अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते याच वेळी त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यात त्याचा पॉझिटिव्ह आवाज आल्यामुळे त्याच्यावर उपचारही सुरू होते मात्र आज अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण दगावण्याची ही सहावी घटना आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!