परळीबीड

परळीतील एक रुग्ण पॉझिटिव्ह;औरंगाबाद येथे उपचार सुरु

परळी
शहरातील कालरात्री देवी मंदिर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला स्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्या महिलेस तात्काळ औरंगाबाद यथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारादरम्यान तपासणी केली असता सदर महिला रुगणाचा रिपार्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे.
परळी शहरातील जुन्या गावभागात असलेला रुग्ण तो औरंगाबाद येथे कोरोना पोझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.आजच हाळंम येथील दोन कोरोनाग्रस्तानी मात करुन परळीसाठीआनंदाची कोरोनामुक्तची बातमी दिली होती. सुञाच्या माहिती नुसार परळी शहरातील जुन्या गावभागातील एकाला इतर आजारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दरम्यान त्या रुग्णाच्या लाळीचे नमुने घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.हा रुग्ण सध्या औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार घेत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *