बीड

कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 38 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 22 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 628 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 38 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 590 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 10 आष्टी 1 बीड 19, केज 3 माजलगाव 1 परळी 2 शिरूर 2

बीड जिल्ह्यात काल 45 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 17461 इतकी बाधित संख्या झाली आहे तर 16688 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत आतापर्यंत 550 रुग्ण दगावले आहेत सध्या 213 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 95.57% इतका आहे आतापर्यंत 1लाख 91 हजार 185 लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यात 1 लाख 73 हजार 724 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत

राज्यात 2886 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 3980 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1903408 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 45622 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.13% झाले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 878 इतकी झाला आहे.