हरवलेल्या फोन बाबत येणाऱ्या ई-मेल पासून सावधान…

मुंबई – सध्या लॉकडाउनच्या काळात सायबर भामटे हे नागरिकांना फसविण्यासाठी विविध क्लुप्त्यांचा वापर करत आहेत . त्यातच त्यांनी हरवलेल्या फोन बाबत ई-मेल करून त्याव्दारे फसवणूकीची नवीन क्लुप्ती शोधून काढली आहे. त्यामुळे हरवलेल्या फोन बाबत येणाऱ्या ई-मेल पासून सावधान राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

आपल्याकडे बरेच नागकरिक स्वतःचा मोबाईल फोन हरविला की त्याची तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करतात व त्याचा तपास नाही लागल्यास, परत नवीन मोबाईल विकत घेऊन, आपल्या रोजच्या आयुष्यात व्यस्त होतात . याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर भामटे पोलिसांच्या नावाने एक ई-मेल पाठवत आहेत .
सदर ई-मेल मध्ये नमूद असते कि ‘तुमचा हरविलेला मोबाईल सापडला आहे .त्याचा परत मिळण्याचे ठराविक खर्च आहे तो तुम्ही केलात कि तुम्हाला तुमचा मोबाईल परत मिळेल. लॉकडाउनच्या काळात आम्ही प्रत्यक्ष येऊ शकत नाही, त्यामुळे ई-मेलमध्ये नमूद केलेल्या बँक खात्यात पेटीएम, गुगल पे (paytm ,google pay) किंवा अन्य माध्यमांद्वारे आपण ठराविक रक्कम जमा करावी.
कृपया असल्या ई-मेल किंवा मेसेजला बळी पडून कोणत्याही प्रकारची रक्कम ,खात्यात भरू नका . सदर ई-मेल खरा आहे का खोटा याची आधी तपासणी करा. हि तपासणी सोप्या पद्धतीने देखील करता येते ,जर तुम्ही जी-मेल gmail चा वापर करत असाल तर असे मेसेज आल्यावर व तो ओपन केल्यावर रिप्लाय (reply) च्या बाजूला ३ उभे ठिपके दिसतील त्यावर क्लिक करा व त्यातील शो ओरिजनल आॅप्शन (show original option) क्लिक करा ,त्यामुळे सदर ई-मेलचा इंटरनेटवरचा सर्व प्रवास समजू शकतो . लक्षात ठेवा जर एखाद्या ई-मेलवर अशा प्रकारचा मेसेज दिसला तर शक्यतो तसा ई-मेल न उघडताच डिलिट करा .
असे ई-मेल आल्यास खालील मुद्द्यांच्या आधारे त्या ई-मेलची सत्यता पडताळण्यास उपयोग होईल :
१) कोणतेही पोलीस अधिकारी कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या पैशांची मागणी ,चोरीच्या सापडलेल्या वस्तू परत करण्यासाठी करणार नाहीत.
२)जर असा ई-मेल आल्यास तुम्ही ज्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे ,तिथे संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून किंवा प्रत्यक्षपणे भेटून ई-मेल मधील मजकुराची सत्यता पडताळून बघा .
३)अधिकृत ई-मेल वरून येणारे इमेल्स हे तुमच्या इनबॉक्समध्ये येतात spam मध्ये नाही .
त्यामुळेअसे ई-मेल आल्यास घाबरून जाऊ नका व त्याची तक्रार www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर नोंदवा , तसेच कोणत्याही परिस्थती मध्ये अशा ई-मेलमध्ये नमूद खात्यामध्ये पैसे transfer करू नका. आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!