अत्यावश्यक सेवेत दूध भाजीपाला मिळणार संचारबंदीत थोडी शिथिलता
बीड
बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे त्याचा इतरत्र प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काल बुधवारी मध्यरात्री संपूर्ण बीड शहरासह परिसरातील बारा गावे लॉक डाऊन केले होते आदेश निघाल्यानंतर नागरिकांकडून काहीसा विरोध होऊ लागला अत्यावश्यक सेवेमध्ये नागरिकांना लागणाऱ्या गरजू वस्तू मिळाल्या पाहिजेत यासाठी आज परत लागू असलेल्या संचारबंदीत थोडेसे बदल करण्यात आले आहेत अत्यावश्यक सेवेमध्ये दूध पुरवठा आणि परवाना दिलेल्या भाजी विक्रेत्यांना डोअर टू डोअर भाजी विकण्यास परवानगी देण्यात आली आहे आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संचार बंदीच्या नियमात हा थोडासा बदल केला आहे
आज काढण्यात आलेल्या आदेशात केवळ दूध विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली असून दूध विक्रेत्यांनी दुधाच्या पाकिटात होम डिलिव्हरी करावी तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या लोकांनी सामाजिक अंतर राखून पाणीपुरवठा करावा अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडर वितरनासही परवानगी देण्यात आली असून पास असलेल्या कर्मचाऱ्यांना सिलेंडर वितरणात परवानगी दिली आहे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पास असणाऱ्यांना रूग्णालयात ये जा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे तर पूर्वीप्रमाणे केवळ परवानाधारक भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेत्यांना घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री परवानगी देण्यात आली आहे