कोरोनाच्या लढ्यातील टीम लीडर डॉ.आर.बी.पवार
टीम लीडर तो असतो जो सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जातो,ज्याच्या केवळ प्रत्येकाच्या कौशल्याला,ज्ञानाला संधी देण्याचे मोठेपण असते,जो सर्वांचे ऐकून सहमतीने कार्य करतो आणि स्वतः पुढे राहून आदर्श निर्माण करतो.बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.आर.बी.पवार हे असेच ,आपल्या कार्यातून ओळख निर्माण करणारे अधिकारी
.त्यांनी पाटोदा आणि वडवणी येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्य केले.2005 -06 साली जेव्हा जिल्ह्यात चिकन गुणियाची साथ आली होती तेव्हा त्यांनी अति.जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावले. नंदुरबार सारख्या अति दुर्गम भागात आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सुध्दा त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून आपला दबदबा निर्माण केला.आपला जिल्हा प्रत्येक आरोग्य मोहीम आणि कार्यात प्रथम क्रमांकावर कसा राहील या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो.त्यासाठी योग्य ते नियोजन आणि त्याला जोडून कितीही कष्टाची त्यांची तयारी असते.पुण्यात पहिला कोरोनाबधित आढळला,त्यात बीडच्या तिघांचे नाव आले आणि तेव्हापासून सरांनी कोरोनाच्या विरोधात कंबर कसली.
आणि आजही त्याच्या विरोधात ते ठामपणे उभे आहेत. या कसोटीच्या काळात देखील ते शांतचित्ताने कार्यरत आहेत. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊन अगदी नेहमीप्रमाणे. आपलं प्रशासनातील सारं कसब आणि अनुभव पणाला लावून त्यांनी अगदी सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टींवर विचार केलाय अन त्यादृष्टीने काम उभं केलयं.करोनाची चाहूल लागताच प्रत्तेक गावात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांचं सर्व्हेक्षण केलं त्यासाठी घराघरात आरोग्य कर्मचारी गेला विशेष म्हणजे, हा सर्व्हे आॅनलाइन करण्याचा दुरदर्शीपणा दाखवला. ज्यातून २ लाख लोकांचा डाटा संकलित करता आला.याचवेळी सरांनी ‘बीड कोव्हीड१९’ सारखे वेगवेगळे अॅप तयार करुन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला,त्यांना नवतंत्रज्ञानाची आवड असून ते वापरण्यावर त्याचा भर असतो. गावपातळीवर संवादासाठी त्यांनी व्ही.सी.चा प्रभावी वापर केला. आशा, एएचएम ,एलएचव्ही, एमओ ,टीएचओ यांच्याशी थेट संवाद साधला. .डॉ.आर.बी.पवार यांच्याकडे कर्मचा-यांच्या नाव,गाव आणि नियुक्ती आदेशासह प्लॅन बी देखील नेहमीच तयार असतो . त्यांच्या तत्परतेमुळेच जेव्हा जिल्ह्यात एक रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समजले तेव्हा त्याच्या दुस-या दिवशी १२ गावांमध्ये आरोग्य पथकं पोहचली आणि सायंकाळ पर्यत १० हजार लोकांची ‘स्क्रिनिंग’ पूर्ण करण्याची तत्परता आरोग्य खात्याने दाखवली. ते नेहमीच आरोग्य कर्मचा-यांच्या हिताची काळजी घेतात आणि म्हणूनच सगळ्यांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला ,करत आहेत. प्रत्येक शासनादेशाची त्यांना माहिती असते.त्यांचे संघटन कौशल्य आणि प्रश्न सोडवण्याची तळमळ पाहूनच त्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले आहे. कर्मचा-यांच मनोबल वाढावं म्हणून त्यांनी एकमेकांना फुल देऊन स्वागत करण्याची सुंदर पध्दत राबवली .दिनांक 15/5/2020 रोजी गेवराई माजलगाव तालुक्यातील 2 रुग्ण करोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे कळाल्या बरोबर त्याअगोदरच तालुक्यात प्लॅन बी नुसार सर्वेक्षण चालू आहे व अधिकारी कर्मचारी यांना अत्यंत धिर देऊन काम करण्याच्या सूचना दिल्या स्वतः या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून असून पुन्हा आष्टीतील 7 रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले आपले उत्कृष्ट नोयोजन त्यात तालुका अधिकारी यांचे उत्कृष्ट नियोजन यामुळे परिस्थितीशी मुकाबला करत.आहोत सर तुम्ही फक्त लढ म्हणा अधिकारी कर्मचारी कुठेही आपल्या कामात कमी पडणार नाहीत म्हणूनच म्हणतो
टीम लीडर असावा तर असा
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी , सहकारी म्हणूनच प्रत्येक मोहीमेत त्यांच्या सोबत होता,आहे.म्हणूनच आज त्यांच्या सोबत काम करण्याचे आम्हाला समाधान आहे.
आर.वाय. कुलकर्णी,( आरोग्य सहाय्यक) .जिल्हा प्रशिक्षण संघ बीड.