ग्रीन झोनमधले निर्बंध आणखी शिथिल करत आहोत-मुख्यमंत्री

मुंबई/प्रतिनिधी
कुणालाही घरी डांबून ठेवण्यासारखी शिक्षा नाही. हा चक्रव्यूह कधी भेदणार, याचं उत्तर जगात कुणाकडे नाही. कोरोनाच्या वाढीमध्ये आपण गतिरोधक नक्कीच निर्माण केला आहे .राज्यात 50 हजार उद्योग सुरू झाले आहेत.
लॉकडाऊन का वाढवला हे सांगत असतानाच नवा लॉकडाऊन कसा असेल याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आणखी काही निर्बंध शिथिल होणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. पण महापालिका क्षेत्रातल्या रेड झोन क्षेत्रांमध्ये निर्बंधांमध्ये फारशी शिथिलता आणता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

31 मे पर्यंत महाराष्ट्रासह देश लॉकडाऊनमध्ये आहे. पण यामागे कुणाला डांबून ठेवायचा उद्देश नाही, असं ठाकरे म्हणाले. “कुणालाही घरात डांबून ठेवणं यासारखी शिक्षा नाही. लॉकडाऊनचं चक्रव्यूह भेदणार आहोत की नाही, याचं उत्तर जगात कुणाकडे नाही. आपल्याकडेही नाही”, असं त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊन का वाढवला?

महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढते आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद इथे जास्त रुग्ण आहेत. जर लॉकडाऊन, संचारबंदी केली नसली तर रुग्णसंख्या किती झाली असती, किती लोक गमावले असते याची आकडेवारी ऐकून अंगावर काटा येतो. कोरोना संपलेला नसला, तरी त्याचा संसर्ग कमी झाला आहे. गतिरोधक म्हणून लॉकडाऊनचा उपयोग झाला आहे.

आजपर्यंत 50 हजार उद्योग सुरू झाले आहेत. 5 लाख मजूर आणि कामगार काम करू लागले आहेत. 70 हजार उद्योगांना परवानगी दिली आहे. पण महापालिका क्षेत्रात निर्बंध अजूनही कडक आहेत. महापालिकांच्या व्यतिरिक्त भागात उद्योग सुरू झाले आहेत.

Coronavirus चा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्यामुळे आजपासून देशभरात चौथ्यांदा टाळेबंदी कायम ठेवली आहे. या Lockdown 4.0 ला सुरुवात झाली असली तरी या लॉकडाऊनमध्ये आधीपेक्षा अनेक निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.कोरोना बरोबर जगायचं शिकावं लागेल,रेड झोनमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका पुढचे काही दिवस महिने काळजी घ्यावी लागेल,लॉक डाऊन चे उत्तर कुणाकडेच नाही,सावध राहायला हवे,हळूहळू सगळं पूर्व पदावर आणूयात असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!