करोना चाचणीसाठी ठेवण्यात आलेला मृतदेह गायब

नवी मुंबई: नवी मुंबईतील एनएमएमसी रुग्णालयात करोना चाचणीसाठी ठेवण्यात आलेला मृतदेह गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एनएमएमसी रुग्णालय हे नवी मुंबई महापालिकेचं सर्वात मोठं रुग्णालय आहे. ९ मे रोजी उलवे येथे राहणाऱ्या उमर फारूख शेख या २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. यावेळी रुग्णालयाने दोन-तीन दिवसात मृतदेहाची कोविड टेस्ट करून तुमच्याकडे मृतदेह सोपवलं जाईल असं उमरच्या नातेवाईकांना सांगण्यात आले होते. उमरला करोनाची लागण झाली होती की नाही, याची तपासणी करण्यासाठी याचा तपास करण्यासाठी त्याचा मृतदेह रुग्णालयात ठेवून घेण्यात आला होता. १४ मे रोजी त्याचा तपासणी अहवाल आला. त्यात त्याला करोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं होतं.
त्यामुळे शेख कुटुंब उमरचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. मात्र, त्यांना रुग्णालयात त्याचा मृतदेह सापडला नाही. उमरचा मृतदेह कुठे आहे? याची माहिती रुग्णालय प्रशासन देत नसल्याचा आरोप शेख कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, रुग्णालयातील घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!