तीन महिन्याची नियुक्ती असताना दिडच महिन्यात काढून टाकले:स्टाफ नर्स भेटल्या माजीमंत्री क्षीरसागर यांना
बीड/प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढली होती आशा काळात रुग्णसेवा करण्यासाठी इच्छुकांनी पुढे यावे असे सरकारने आवाहन केले त्याला प्रतिसाद देत आपला जीव जोखमीत टाकून महिला नर्स पुढे आल्या,बीडमध्ये जे कोविड सेंटर उघण्यात आले तेथे 35 नर्सच्या नियुक्त्या करण्यात आल्या नियुक्ती देताना तीन महिन्याचा कालावधी ठरवून देण्यात आला मात्र त्यातील 14 जणींना दिडच महिन्यात काढून टाकण्यात आले हा आपल्यावर अन्याय असे म्हणत या सर्वांनी आज माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले,शासनाने जर नियमानुसार नियुक्त्या दिल्या असतील तर दिलेल्या कालावधीपर्यंत त्यांना सेवेची संधी द्यावी असे माजीमंत्री क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले याबाबत आपण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधून बोलतो असेही ते म्हणाले
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बीड जिल्ह्यात देखील रुग्ण संख्या वाढू लागली याच काळात शासकीय रुग्णालयात या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी सेंटरची स्थापना करण्यात आली याठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स च्या नियुक्त्या करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णसेवेसाठी अशा उमेदवारांनी पुढे यावे असे आवाहन केले त्यानंतर बीड जिल्ह्यात 35 नर्सच्या नियुक्त्या करण्यात आल्या,नियुक्ती करतानाच किमान 3 महिन्यासाठी ही सेवा असून कंत्राटी पद्धतीने असल्याची अट आहे तसेच सेवेनंतर सेवाप्रमानपत्र देण्याचेही ऑर्डरमध्ये सांगण्यात आले आहे,नियुक्त करण्यात आलेल्या स्टाफ नर्स ह्या बाहेर गावातून बीडमध्ये सेवेसाठी दाखल झाल्या आहेत मात्र त्यातील 14 नर्सना सेवा कालावधी होण्यापूर्वी त्यांना काढून टाकण्यात आले ही बाब अन्यायकारक आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी रुग्ण सेवा केली,घरदार सोडून बीडमध्ये आल्या तीन महिन्याचे नियोजन करत त्यांनी पूर्वीच्या ठिकाणी राजीनामे दिले आता कालावधी पूर्वीच त्यांना सेवेतून काढल्याने पुढे करायचे असा प्रश्न निर्माण झाला,आज या सर्वजणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना भेटण्यास आल्या होत्या त्यांनी सर्व माहिती दिल्यानंतर मा क्षीरसागर यांनी सम्बधित अधिकारी यांना दूरध्वनी करून विचारणा केली याबाबत आपण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना बोलून दिलेल्या कालावधीत सेवा करू द्यावी यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे सांगितले यावेळी शिवसेनेचे धनंजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नर्सेस उपस्थित होत्या