आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत कायम:आणखी एका महिलेचा घेतला जीव

आष्टी दि.29 – मागच्या कांही दिवसांपासून आष्टी, शिरूर च्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ रात्र रात्र जागून काढत आहेत. बिबट्याने घातलेला धुमाकूळ लोकांच्या प्राणासी येत आहे. सकाळी एका महिलेवर हल्ला केल्यानंतर पुन्हा एका महिलेचा प्राण घेतल्याची घटना घडली आहे.

पारगाव जोगेश्वरीमध्ये एका महिलेला आपला शिकार बनवल्याचे रविवारी सायंकाळी समोर आले. सकाळी गवत काढणाऱ्या शालन भोसले (वय-६७) या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता.यामध्ये त्या महिलेच्या गळ्यावर बिबट्याचे नखे लागली होती.मात्र त्या महिलेच्या पुतण्या आणि सुनेने धाडस करून बिबट्याच्या तावडीतून महिलेची सुटका केल्यानंतर आज सायंकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान सुरेखा निळकंठ बळे (भोसले) वय ५० ही, महिला कापूस वेचुन एकटीच घरी परतत असताना बिबटयाने सायंकाळी ६ च्या सुमारास तिला शिकार बनविले.यावेळी त्या महिलेसोबत कुणीही नसल्याने तिला ठार मारल्याची घटना समोर आली आहे. जोगेश्वरी मंदिराच्या जवळ असणाऱ्या बळे वस्तीवर ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
विशेष पथकांच्या साहाय्याने बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप यश न आल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.


error: Content is protected !!