बीड जिल्ह्यात 79 जणांना डिस्चार्ज तर 69 पॉझिटिव्ह आढळले

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 818 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 69 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 749 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 2, आष्टी 11

बीड 31, धारूर 3, गेवराई 4,

केज 2, माजलगाव 7,

परळी 2 , पाटोदा 3

शिरूर 2, वडवणी 2

रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 12882 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 11276 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1193 जणांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी 79 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 413 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


error: Content is protected !!