बीड

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा:नागरिकांनो सावधान

बीड- प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांच्यावतीने दिनांक 13 ऑक्टोबर रोजी एक वाजता सूचना जारी करण्यात आली असून यामध्ये दिनांक 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्‍टोबर या काळात मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून नैसर्गिक आपत्ती संदर्भात जनतेने खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान शास्त्र मुंबई यांनी दिनांक 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्‍टोबर या काळात मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट होऊन मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे वीजेचा गडगडाट सह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाण्याचे टाळावे मोकळ्या जागेत असा आणि जवळपास कुठलीही सुरक्षित इमारत नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालुन बसा, आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत असलेल्या घराच्या बाल्कनी अथवा घरा बाहेर ओट्यावर थांबू नका आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील ही उपकरणे त्वरित बंद करा, तारांचे कुंपण विजेचे खांब व लोखंडी वस्तू पासून दूर राहा, पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा, आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका, शावर खाली आंघोळ करू नका घरातील बेसिनचा नळ पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या साह्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका धातूंच्या उंच मनोरा जवळ उभा राहू नका जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबणे इतकेच धोकादायक असल्याचे हवामान खात्याने कळवले असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आव्हान निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे