कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा संकल्प करा-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड
बीड शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन सम्पूर्ण तयारीने कामाला लागले आहे सुरुवातीला कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेले लोक आढळून येत होते आता मात्र लक्षणे आहेत पण ती जाणवत नाहीत व नंतर त्रास सुरू झाल्यावर त्या रुग्णात कोरोना लक्षणे आढळून येत आहेत त्यामुळे न कळत याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीड शहरात 8 दिवसासाठी कडक संचारबंदी लागू करावी लागली आहे या दरम्यान प्रत्येक घरात आरोग्य सेवक व कर्मचारी येऊन आरोग्य तपासणी व सर्वे करत आहे त्यामुळे बाधीत रुग्ण ओळखणे सोपे जाणार आहे प्रत्येक नागरिकाने आता घरा बाहेर जाऊ नये व घरातील वृद्ध आणि मुलांना देखील घरा बाहेर पडू देऊ नये ही सतर्कता बाळगली तर आपण कोरोनाला नक्कीच हद्दपार करू शकू असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केले आहे एका व्हिडीओ द्वारे त्यांनी जिल्हा वाशियाना ही विनंती केली आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मनापासून संकल्प करावा व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असेही आवाहन त्यांनी केले आहे