आजही इंधनची दरवाढ:पेट्रोल झाले 85 रुपये तर डिझेल 75.53
मुंबई : सलग १३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. शुक्रवारी मुंबईत पेट्रोल ८५.२१ रुपये झाले. गुरुवारी पेट्रोलचा भाव ८४.६६ रुपये होता. त्यात ५५ पैशांची वाढ झाली. आज डिझेलचा भाव प्रती लीटर ७५.५३ रुपये झाला आहे. यापूर्वी मुंबईत पेट्रोलने ९१ रुपयांचा उच्चांक गाठला आहे.
मुंबईत पेट्रोलने ८५ ची पातळी ओलांडली आहे. आज पेट्रोलचा एक लीटरचा भाव ८५.२१ रुपयांवर गेला आहे. गेल्या २० महिन्यांतील हा सर्वाधिक दर आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये पेट्रोल ८५ रुपयांवर गेले होते. दिल्लीत पेट्रोलचा दर ७८.३७ रुपये झाला आहे. गुरुवारी तो ७७.८१ रुपये झाला आहे. आज त्यात ५६ पैशांची वाढ झाली. आजचा डिझेलचा भाव ७७.०६ रुपये झाला आहे. त्यात ६३ पैशांची वाढ झाली.