आरोग्य विभागात 25 हजार पदे भरण्यात येणार-मंत्री अमित देशमुख

बीड शहरात कोरोना नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यास मंजुरी

बीड, दि. २६:- कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण राखण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी दिलेली साथ यामुळे बीड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात राखण्यात यश आले आहे असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केले.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन अंबाजोगाई येथे करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार , मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, नगराध्यक्ष रचना मोदी, अधिष्ठाता डॉ सुधिर देशमुख आदी उपस्थित होते

वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले , कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना लागू केल्या आहेत सुरुवातीला राज्यात फक्त दोनच व्हीआरडीएल प्रयोगशाळा होत्या तेथे फारच मर्यादित नमुने तपासणी करणे शक्य होते परंतु या कालावधीत त्यांच्यात वाढ करून राज्यातील प्रयोगशाळांमध्ये आता 50000 नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. बीड या जिल्ह्याच्या ठिकाणी देखील व्हीआरडीएल प्रयोगशाळा उभारणीस तत्वतः मंजुरी, एमआरआय मशीन ला मंजुरी देण्यात आली आहे,असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, वैद्यकीय सुविधा न मध्ये वाढ करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे यामुळे महाराष्ट्रात जगातील सर्वात विस्तारित असे प्लाझमा थेरपी सेंटर उभारण्यात येत असून त्याचे लवकरच उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होईल त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही प्लाझमा बँक सुरू करण्यात येईल.
नागरिकांना तत्पर आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा देतानाच आयुर्वेद युनानी आधी वैद्यकीय उपचारांना देखील चालना देण्यात येईल वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी आरोग्य विभागात पंचवीस हजार पदे भरण्यात येणार आहे असे ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!