बीड

बीड जिल्ह्यात 5 कोरोना बाधित:राज्यात 1151 तर देशात 14148 कोरोना बाधित

बीड जिल्ह्यात आज दि 24 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 981 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 5 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 976 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 1 बीड 2 शिरूर 1असे रुग्ण आढळून आले आहेत

महाराष्ट्रात 1151 नव्या कोरोना रूग्णांचं निदान

महाराष्ट्रात काल दिवसभरात 1151 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर 23 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे. राज्यात 2594 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

आजपर्यंत राज्यात 77 लाख 2 हजार 217 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.7 टक्के इतकं झालं आहे.

देशात कोरोनाचे 14148 नवीन रुग्ण

Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये थोडी घट झाली आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 14 हजार 148 नवीन रुग्ण आढळले असून 302 जणांचा मृत्यू झाला आहे.काल 15 हजार 102 रुग्णांची नोंद झाली होती. म्हणजेच कालच्या तुलनेत आज रुग्णवाढ कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 30 हजार 9 लोक बरे झाले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.

सक्रिय प्रकरणांची संख्या 1 लाख 48 हजार 359 इतकी कमी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 48 हजार 359 इतकी झाली आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 12 हजार 924 इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 22 लाख 19 हजार 896 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *