स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन सदैव प्रेरणादायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जयंती निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

मुंबई, दि. २८ :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जीवनातील क्षण आणि क्षण अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन. वीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रखर देशभक्त, उत्कृष्ट लेखक, प्रभावी वक्ता, संवेदनशील कवी, नाटककार आणि इतिहासकार असे पैलू होते. सामाजिक सुधारणा रुजविण्यासाठी त्यांनी क्रियाशीलपणे वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुरस्कार केला. या महान देशभक्ताचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. वीर सावरकर यांना शतशः नमन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!