उस्मानाबाद

उस्मानाबादमध्ये करोनाच्या भितीने वडिलांवर अंत्यसंस्कारास नकार

उस्मानाबाद – जिल्ह्यात 64 वर्षांच्या एका वृद्धाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. हा व्यक्ती करोना पॉझिटिव्ह नव्हता. मात्र, त्यांची पत्नी करोनाबाधित होती. त्यांच्यावर परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृताला दम्याचा आजार होता.

उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचा मतदेह ताब्यात घ्यायला मुलाने नकार दिला. मुलाने परंडा पोलिसांत आपण मृतदेहावर अत्यंस्कार करू शकत नाही, असे लिहून दिले. त्यानंतर आज दोन दिवसांनी उस्मानाबाद पालिकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. करोनामुळे पसरलेल्या अवास्तव भीतीमुळे निगेटिव्ह असलेल्या जन्मदात्या पित्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास पोटच्या मुलानेच नकार दिला. त्यामुळे मृत्यूनंतर दोन दिवस मृतदेह उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पडून होता. तसेच जन्मदात्या पित्यावर अंत्यसंस्कार करण्यास असमर्थ असल्याचे मुलाने लिहून दिल्यामुळे बेवारस अशी नोंद घेत उस्मानाबाद नगरपालिकेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. सोमवारी मयत झालेल्या परंडा तालुक्‍यातील उकडगाव येथील मयतावर बुधवारी दुपारी येथील कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *