तिरूमलाच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा संपूर्ण भारतात एकाच दिवशी स्पर्धेचे आयोजन-अर्चनाताई कुटे
बीड / प्रतिनिधी : तिरूमलाच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे संपूर्ण भारतातात दि. १४ फेब्रुवारी या दिवशी एकाच वेळी आयोजन करण्यात आले असून महिलांना आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कुटे ग्रुपच्या मॅनेजींग डायरेक्टर अर्चना सुरेश कुटे यांनी केले आहे.
गेल्या दोन तीन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनामुळे लॉकडाऊन होते. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि महिलांना स्पर्धेच्या माध्यमातून थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण भारतात जिल्हा आणि तालुका स्थरावर ही स्पर्धा होत असून चार सत्रामधील या स्पर्धेत खेळाचे प्रकार संगीत खुर्ची, बकेट बॉल, फुगे फुगवणे आणि अंतिम सत्र हे प्रश्न मंजुषाचे राहणार आहे. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या स्पर्धेकाला तिरूमला सुर्यफुल तेल १५ लिटर जार, कोकोनट तेल १ लिटर जार, ग्रेॅन्युला तुप ५०० मि. ली. जार, गुडमॉनिंग दुधाचे एक लिटर पॅकेज बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तर व्दितीय बक्षीस हे तिरूमला सुर्यफुल १० लिटर, तिरूमला कोकोनट तेल ५०० मि.ली. बॉटल, ग्रॅन्युला तुप ५०० मि.ली. जार आणि दूध पॅकेट १ लिटर,
तृतीय बक्षीस हे तिरूमला सुर्यफुल ५ लिटर, तिरूमला कोकोनट तेल २५० मि.ली. बॉटल, ग्रॅन्युला तुप २०० मि.ली. जार आणि दूध पॅकेट १ लिटर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन कुटे ग्रुपच्या मॅनिजिग डायरेक्टर अर्चना सुरेशराव कुटे यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९७६७५८२४१४ या क्र मांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कुटे ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
तणाव दूर करण्यासाठी स्पर्धा
कोरोनामुळे प्रत्येकावर एक मानसिक दडपण होते. यातून बाहेर पडण्यासाठी आणि महिलांवरील ताण तणाव दूर करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता संपूर्ण भारतात या स्पर्धा एकाच वेळी होणार आहेत. स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा. अर्चना सुरेश कुटे ( मॅनेजिंग डायरेक्टर,कुटे ग्रुप)