उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा आढळले 7 पॉजिटीव्ह

उस्मानाबाद -प्रतिनिधी

जिल्हातील 11 प्रलंबित अहवालांपैकी 7 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे जिल्हात कोरोना बाधित रुग्णांचे अर्धशतक झाले आहे. 11 प्रलंबित व्यक्ती पैकी 2 जण निगेटीव्ह आणि 2 अनिर्णित अहवाल आले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दि 26 मे 2020 रोजी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या स्वब पैकी 11 व्यक्तीच्या स्वब चे रिपोर्ट प्रलंबित आले होते . त्या 11 पैकी 7 व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर 2 व्यक्तीचा निगेटिव्ह आणि 2 व्यक्तीचा अनिर्णित आला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
पॉझिटिव्ह आलेल्या सात व्यक्ती पैकी दोन व्यक्ती ह्या जेवळी मधील पूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील आहेत व ते मुंबई रिटर्न आहेत तर तुळजापूर तालुक्यातील कारला तीन रुग्ण असून ते मुंबई रिटर्न्स आहेत तसेच धुता येथील एक रुग्ण असून तो पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील असून तो ही मुंबई रिटर्न्स आहे तर एक रुग्ण केसरजवळगा येथील असून तोही पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!