आरोग्य मंत्रालयाने दिली आनंदाची बातमी:सर्वानाच लसीची गरज भासणार नाही

देशात कोरोना संकटाबाबत आरोग्य मंत्रालयाने एक चांगली बातमी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण म्हणाले की 11 नोव्हेंबर रोजी देशात कोरोना लागण होण्याचे प्रमाण 7.15 टक्के होता. तो घटून एक डिसेंबर रोजी 6.69टक्क्यांवर पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात दिवसाला कोरोना लागण होण्याचा दर सरासरी 3.72 टक्के इतका होता. जगात हिंदुस्थानात प्रति 10 लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी आहे. गेल्या 7 दिवसांत युरोपीयन देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

सीरम इन्स्टिट्युटच्या कोरोना लशीवर सचिव राजेश भुषण म्हणाले की, लस बनवताना जरी काही चुका झाल्या असल्या तरी लस बनवण्यावर त्याचा परिणाम होणार नाही.

वेळीच लस तयार होऊन ती देशात उपलब्ध होईल. लशीच्या क्लिनिकल ट्रायलवर निगराणी ठेवण्यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे. ही समिती प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवून आहे. फक्त हिंदुस्थानच नाही तर इतर देशातही अशा प्रकारची समिती स्थापन करण्यात आल्याचे भुषण यांनी सांगितले.

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की लस किती जणांना दिली जाईल हे लशीच्या उत्पादनावर अवलंबून आहे. आपण जर कोरोना विषाणूची साखळी तोडली तर प्रत्येकाला लस देण्याची गरज नाही असे भार्गव म्हणाले.


error: Content is protected !!