जागतिक आरोग्य संघटनेकडून मलेरिया औषधाच्या वापरावर बंदी

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात औषधाचे संशोधन सुरु आहे. जगभरातील अनेक देश कोरोनाबाधित रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या देत आहे. मात्र जगभरातील अनेक देशांनी या औषधांच्या वापरावर बंदी घातली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने देखील याचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. कोरोनाच्या उपचारासाठी मलेरियाचे औषध वापरु नये, असे डब्लूएचओने सांगितले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी म्हटले, खबरदारी म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची क्लिनिकल चाचणी तात्पुरती बंद केली आहे. हा निर्णय एका रिपोर्टच्या आधारे घेतल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. या रिपोर्टमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांमुळे कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. या रिपोर्टच्या आधारावर या गोळ्यांचा वापर बंद केल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले आहे.
डब्लूएचओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी मलेरिया आणि अन्य आजारांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन किंवा क्लोरोक्विनचा कोरोनाच्या उपचारासाठी वापर करण्याबाबत इशारा दिला होता. या गोळ्यांना क्लिनिकल ट्रायलमध्ये वापरण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी सां

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!