बीड

बीड जिल्ह्यात आज 11 पॉझिटिव्ह तर 123 सक्रिय रुग्ण:राज्यात 1130 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 31 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 965 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 11 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 954 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात आष्टी 5 बीड 3 धारूर 1 परळी 1 शिरूर 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात फक्त 123 रुग्ण ऍक्टिव्ह

काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 13 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 123 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3277 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 0349 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 0.71 % आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2805 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,16%इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 3178 पैकी 3055 बेड शिल्लक आहेत

राज्यात 1130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

शनिवारी राज्यात 1130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 49 हजार 186 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.57 टक्के आहे. राज्यात आज 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *