व्यापार

बांधकाम क्षेत्राला ‘बुस्टर’ची गरज

पुणे  – गेल्या काही वर्षांपासून बांधकाम क्षेत्रावर असलेले मंदीचे सावट दूर होण्याची चिन्हे असतानाच मार्च महिन्यात  ‘करोना’चे संकट आले.  त्यामुळे जवळपास दीड ते दोन महिने सर्व टाळेबंद होते. त्यानंतर ‘अनलॉक’ प्रक्रियेनंतर बांधकामांच्या ठिकाणी कामगारांचा बिकट प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदवार आल्यानंतर ग्राहकांकडून अल्पसा प्रतिसाद मिळतो आहे.  मात्र, या क्षेत्राला नवचैतन्य मिळण्यासाठी ‘बुस्टर’ची गरज असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.

अनेक जण आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी  अनेक जण पुढेही आले होते. मात्र, करोना व लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली, वेतन कपात झाली त्यामुळे घरांना वाढलेली मागणी पुन्हा कमी झाली. बॅंकांनी गृहकर्जाच्या व्याजदर कमी केल्याने  दसरा, दिवाळीत पुन्हा मागणी वाढेल, असा अंदाज व्यक्‍त होत आहे.

या अडचणींच्या काळाच ग्राहकांसह बांधकाम व्यावसायिकांनी विविध माध्यमातून बळ मिळाले तर रोजगार निर्मिती करणाऱ्या या क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असे मत बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केले.

दरम्यान, रेडीरेकनरचे दर वाढल्याने व्यावसायाला पुन्हा मरगळ येण्याची भीती व्यक्‍त होत असून यासाठी ‘बुस्टर’ची नितांत गरज असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अनाधिकृत प्लॉटिंग, अनाधिकृत वसाहतींना आळा घालणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिक तेथे खरेदी करतात. त्यांची फसवणूक होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे असे प्रकार रोखणे गरजेचे आहे.