बीड

बीड जिल्ह्यात आज 14 पॉझिटिव्ह तर 133 सक्रिय रुग्ण:राज्यात 1201 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 27 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1366 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 14 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1352 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 6 बीड 2 माजलगाव 2 परळी 1 पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात फक्त 133 रुग्ण ऍक्टिव्ह

काल दिवसभरात बीड जिल्ह्यात 13 रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे,सध्या जिल्ह्यात 133 रुग्णावर उपचार सुरू आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 3237 एकूण बाधित संख्या झाली आहे,तर 1 लाख 0302 रुग्ण बरे झाले आहेत,काल जिल्ह्यात दिवसाचा पॉझिटिव्ह रेट 1.5% आहे तर डेथ रेट 2.71%आहे ,आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2800 जणांचा बळी गेला आहे,जिल्ह्याचा एकूण रिकव्हरी रेट 97,15 %इतका पोहचला आहे,81 कोविड सेंटर मध्ये 3002 बेड शिल्लक आहेत

राज्यात १२०१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार २०१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
तर ३२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात १३७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४८ टक्के आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.

राज्यात सध्या २२ हजार ९८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *