नेकीं कर दरीया मे डाल..! धनंजय वाघमारे यांचा कौतुकास्पद उपक्रम

बीड
कसलाही गाजावाजा न करता गेल्या 50दिवसांपासून दररोज शेकडो लोकांना 2 वेळेचे घरपोच जेवण आणि गरीब व मजुरी करणाऱ्या गरीब कटुंबाला किराणा सामानाचे वाटप आणि हजारो मास्क चे वाटप ते त्यांच्या चंपावती सामाजिक प्रतिष्ठाण ,बीड या त्यांचा प्रतिष्ठाण च्या माध्यमातून करत आहेत कोरोनाच्या वैश्विक लढ्यात सामाजिक भान जपणारे अनेकजण आपापल्या परीने लढा देत आहेत. कित्येकांनी गरीबाच्या पोटाची भूक भागवण्याचे उत्तरदायित्व आपल्या खांद्यावर घेत आपापल्या परीने अन्नपूर्णा आपल्या घरात – अंगणात साक्षात उभी केली आहे. याचाच प्रत्यय बीडमध्येही आला आहे पेठबीड भागातील धनंजय वाघमारे यांच्या रूपाने!


ते गेले 50 दिवस शेकडो गोरगरीब गरजूंची भूक शमवत आहेत, तेही कसलाही गाजावाजा न करता, प्रसिद्धी पासून दूर राहून. त्यांनी गेले वीस दिवस दररोज नागरिकांना स्वखर्चाणे अविरत जेवणाचे डबे पुरवत आहे आणि किराणा सामानाचे वाटप करीत आहेत.तसेच त्यांच्या कडून स्वखर्चातून जो पर्यंत डबे व किराणा सामान त्यांना देता येईल तो पर्यंत मी देईन असा त्यांचा मानस आहे. चार दिवसांपूर्वी एका राजनैतिक मदतगारावर सिनेअभिनेते परेश रावल यांनी ‘एक दर्जन आलू और उसे बांटने वाले दो दर्जन’ अशा शब्दात मदतीचा उहापोह केवळ प्रसिद्धी साठी करणाऱ्यावर टीका केली होती. परंतु धनंजय वाघमारे यांच्यासारखे तरुण याला अपवाद आहेत. खरंतर अशा कठीण काळात कुणाच्याही मार्फत, कोणत्याही स्वरूपात गरजूंना मदत मिळते हे महत्वाचे असते.
बीड भागात हातावर पोट असलेले, मोल मजुरी करून जगणारे, छोटे गरीब व्यवसायिक असे असंख्य कुटूंब आहेत. लॉकडाऊन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थत धनंजय वाघमारे यांनी मदतीचा यज्ञ अखंड सुरू ठेवला आहे.
दररोज स्वखर्चाने त्यांच्या मित्रपरिवरच मदतीने लोकांचे 2 वेळेचे जेवण देऊन आणि किराणा सामानाचे वाटप ते आपल्या भागातील गरजू नागरिकांना घरपोच वाटप करत आहेत. व हजारो मास्क व चे वाटप करीत आहे हे सर्व करत असताना स्वतःला प्रसिद्धी पासून दूर ठेवणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!