बीड जिल्ह्यात आज 29 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3187 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज 29 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3187 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 30 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2194 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 29 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2165 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 4 बीड 6 गेवराई 1 केज 4 माजलगाव 2 पाटोदा 5, शिरूर 2 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत
जिल्ह्यात 42 रुग्ण कोरोनामुक्त
बीड जिल्ह्यात आज 42 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे जिल्ह्यात एकूण एक लाख 2724 संख्या झाली असून आत्तापर्यंत 2768 जणांचा मृत्यू झाला आहे सध्या 1.3 टक्के पॉझिटिव रेट असून रिकवरी रेट 97 टक्के आहे आत्तापर्यंत 99 हजार 643 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत सध्या बीड जिल्ह्यात 313 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
राज्यात गेल्या 24 तासात ३ हजार १८७ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 253 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
राज्यात आतापर्यंत 63 लाख 68 हजार 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे.
राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे
राज्यात सध्या 36 हजार 675 रुग्णांवर उपचार सुरु आहेत
करोनाची राज्याची स्थिती
- राज्यात आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
- आतापर्यंत १ लाख ३९ हजार ११ रुग्ण करोनाने दगावले.
- आज राज्यात ३ हजार १८७ नवीन रुग्णांचे निदान.
- दिवसभरात ३ हजार २५३ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६८,५३० रुग्णांची करोनावर मात.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२६ टक्के एवढे झाले आहे.
- राज्यात सध्या करोनाचे ३६ हजार ६७५ सक्रिय रुग्ण.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)