रिक्षा परवानाधारकांना पंधराशे रुपये सानुग्रह अनुदान ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन
बीड, दि. 22 (जि.मा.का.) बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा आणि शिरुर कासार या तालुक्यातील रिक्षा परवाना (परमिट) धारकांना कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले असून रिक्षा परवाना धारकांनी ऑनलाईन पध्उतीने वाहन क्रमांक अनुज्ञप्ती क्रमांक,परवाना क्रमांक अधार क्रमांक इत्यादी माहिती Transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. रिक्षापरवाना धारकांच्या बँक खात्यावर सानुग्रह अनुदान परस्पर जमा होईल असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड यांनी केले आहे.