बीड जिल्ह्याला मोठा दिलासा, 116 स्वॅब निगेटीव्ह

बीड : बीड जिल्ह्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे. 118 व्यक्तींचे स्वॅब आज पाठविण्यात आले होते. त्यापैकी 116 स्वॅब निगेटीव्ह आले असल्याचा अहवाल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर येथील विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

आज बीड जिल्ह्यातून जिल्हा सामान्य रुग्णालय 85, स्वाराती आंबाजोगाई 02, उप जिल्हा रुग्णालय केज 07, ग्रा रुग्णालया आष्टी 00, ग्रामीण रुग्णालय माजलगाव 03, उपजिल्हा रुग्णालय गेवराई 00, उपजिल्हा रुग्णालय परळी येथून 21 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. जे दोन अहवाल प्रलंबीत ठेवण्यात आले आहेत ते आणखी थोड्या वेळात येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!