बीड

स्वा सावरकर शैक्षणिक संकुल तर्फे रिक्षाचालकांच्या कुटुंबांना मदतीचा हात


बीड ( प्रतिनिधी ) सामाजीक जाणीव जोपासणारी भा.शि.प्र.संस्था संचलित बीड शहरातील स्वा सावरकर शैक्षणिक संकुलाची शाळेत विद्यार्थी घेवुन येणारे रिक्शाचालक बंधुना कोरोना प्रभावाच्या काळात त्यांचे व्यवसाय बंद होते त्यामुळे त्यांच्या कुटुंबाना मदत म्हणुन किराणा कीट वाटप एकुण २५ रिक्शा चालक बंधुच्या कुटुंबाना करण्यात आले. शाळेत विद्यार्थ्याची नेआण करुन प्रभावी शैक्षणिक कार्यात मदत करणारे हे आमचे बंधु आहेत या बंधुचा सावरकर शैक्षणिक संकुलाशी रुणानुबंध असतो वेळेवर शाळैस त्यांचे सहकार्य मिळतेकीट वाटप कार्यक्रमास भाशिप्र संस्था सहकार्यवाह प्रा चंद्रकांत मुळे प्राचार्य प्रदीप देशमुख प्रा लश्मीकांत बाहेगव्हाणकर विजेंद्र चौधरी उमेश जगताप शशिकांत पसारकर दिपक देशमुख, हरीभाउ साबळे सचिन सानप यशवंत देशमुख व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *