बीड

बीड जिल्ह्यात आज फक्त 71 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4575 तर देशात 34457 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 22 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4119 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 71 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4048 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 6 आष्टी 8 बीड 24 धारूर 2 गेवराई 2 केज 10 माजलगाव 2 परळी 1 पाटोदा 6 शिरूर 4 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात 4,575 नवीन रुग्णांची नोंद

राज्यात दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून 5 हजारांच्या आत येऊ लागली आहे.
आज 4,575 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5, 914 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 62 लाख 27 हजार 219 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.99 टक्के आहे.

काल दिवसभरात 145 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.11 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात 53 हजार 967 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.

देशात गेल्या २४ तासांत ३४ हजार ४५७ करोनाबाधित

गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्ण संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३४ हजार ४५७ करोनाबाधित आढळले असून ३७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६१ हजार ३४० वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५१ दिवसांतील सर्वात कमी आहे.

भारतात सध्या करोना साथ चालू राहण्यास व नव्याने काही ठिकाणी उद्रेक होण्यास डेल्टा विषाणूच कारणीभूत आहे, त्यामुळे लशीची परिणामकारकता कमी दिसत असून विषाणूचा प्रसार वाढत आहे, असे इन्साकॉग या संस्थेने म्हटले आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *