मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआज दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाचा धोका (corona), मेट्रो कारशेड (Metro car shed) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर विरोधकांकडून होणारे आरोप यासर्वाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. अशात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात पेटून उठले आहेत. त्यामुळे या सगळ्यावरून काही मोठा निर्णय घेतला जाणार आहे का हे पाहणं आता जनतेसाठी महत्त्वाचं असणार आहे.


error: Content is protected !!