बीड जिल्ह्यात 139 पॉझिटिव्ह रुग्ण,बाधितांचे प्रमाण झाले कमी:राज्यात 6686 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 14 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 7001 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 139 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 6862 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 58 बीड 18 धारूर 14 गेवराई 12 केज 4 माजलगाव 8 परळी 6 पाटोदा 12 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात ६ हजार ६८६ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यातील करोनाची (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात असली ती गेल्या अनेक दिवसांपासून कमी न होता स्थिर आहे. आज झालेल्या मृत्यूंची संख्या कालच्या तुलनेत काहीशी कमी असली तरी ती आटोक्यात आल्याचे चित्र नाही. यांमुळे राज्यात काहीशी चिंतेचीच स्थिती कायम आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात एकूण १५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २०८ इतकी होती. तसेच आज दिवसभरात ६ हजार ६८६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच आज एकूण ५ हजार ८६१ इतके रुग्ण बरे झाले आहेत. (maharashtra registered 6686 new cases in a day with 5861 patients recovered and 158 deaths today)
आज राज्यात झालेल्या १५८ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर आता २.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ८० हजार ८७१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८५ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६३ हजार ००४ इतकी आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)