देशनवी दिल्ली

देशात 4 लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख 38 हजार 845 झाली आहे. यामुळेच जगातील कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी देशातील वैज्ञानिकही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. देशात 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी 4 लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी दिली आहे.

भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्या सोशल मीडियावरून साधलेल्या ऑनलाईन संवादात बोलताना आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ‘संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या महामारी रोखण्यासाठी लस विकसित करत आहे. लस तयार करण्यासाठी 100 हून अधिक जण काम करत असून विविध टप्प्यांवर काम केलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटना या प्रयत्नांसाठी मदत करत आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *