ऑनलाइन वृत्तसेवावृत्तसेवा

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले ‘हे’ भन्नाट फिचर; एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ-फोटो होणार डिलीट

फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सतत नवनवीन बदल होत असतात. हे बदल अ‍ॅपचा वापर सोप्पा आणि सुखकर व्हावा म्हणून केले जातात. असेच एक नवीन फिचर कंपनीने आपल्या कोट्यावधी युजर्ससाठी आणेल आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप युजर्स एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ अथवा फोटो डिलिट होणार आहे.

‘व्ह्यू वन्स’ असे या नवीन फिचर नाव असून व्हॉट्सअ‍ॅपकडून या फिचरवर काम करण्यात येत आहे. त्यामुळे हे फिचर सर्व व्हॅट्सअ‍ॅप युजर्ससना तुर्तास उपलब्ध होणार नाही. हे नवीन फीचर आल्यामुळे युजर्सना सततच्या फोटो अथवा व्हिडिओ डिलिट करण्याच्या डोकेदुखीपासून सुटका होणार आहे. अनेक वेळा मोबाईचा डेटा व मेमरी मधील अनावश्यक जागा व्हिडिओ-फोटोमुळे वापरीजाते त्यावेळी या नवीन फिचरचा फायदा युजर्सना होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केल्यानंतर तुम्हाला चॅटमध्ये फोटो / व्हिडिओ पाठविताना ‘व्ह्यू वन्स’ चा ऑप्शन हा पर्याय दिसेल. या फीचरमधील महत्वाची त्रुटी म्हणजे, फोटो अथवा व्हिडिओचा स्क्रीन शॉट घेऊन सेव्ह करता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *