देशनवी दिल्ली

चिनी सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक हुतात्मा

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या हाणामारीत भारताचे जवळपास केवळ तीन नाही तर कमीत कमी २० सैनिक हुताात्मा झाल्याची माहिती वृत्तसंस्था एनएनआयनं दिलीय. दुसरीकडे, गलवानच्या या हाणामारीत चीनी सैन्याच्या ४३ जण गंभीर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यातील काहींचा मृत्यू झाल्याची शक्यताही ‘एएनआय’नं वर्तवली आहे. दरम्यान,

ANI@ANI

At least 20 Indian soldiers killed in the violent face-off with China in Galwan valley in Eastern Ladakh. Casualty numbers could rise: Government Sources

View image on Twitter


दरम्यान, संरक्षण मंत्रालयाकडून या बातमीला दुजोरा देण्यात आलाय. गलवान खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलंय. उंचावरच्या गलवान हाणामारीत १७ गंभीररित्या जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी खाली आणण्यात आलं होतं. उंचावरच्या ठिकाणाच्या तपमानामुळे जखमींचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत एकूण २० भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याचं, अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलंय.

ANI@ANI

Increase in Chinese chopper activity observed across the LAC to airlift casualties suffered by them during face-off with Indian troops in Galwan valley: Sources to ANI https://twitter.com/ANI/status/1272927922177765376 …ANI✔@ANIIndian intercepts reveal that Chinese side suffered 43 casualties including dead and seriously injured in face-off in the Galwan valley: Sources confirm to

दरम्यान याअगोदर, विरोधी पक्षानं अधिकृत माहितीची मागणी केलीय. ‘परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केलेली अधिकृत माहिती आम्ही पाहिली. लष्कराच्या एका आर्मी व्हॉटसअप ग्रुपवर आज दुपारी १२.५२ वाजता देण्यात आलेल्या माहितीनंतर यात कोणतीही नवीन माहिती नाही. देश, संरक्षण मंत्रालयाकडून किंवा सेनेच्या मुख्यालयाकडून अधिकृत माहितीची वाट पाहतोय. आज रात्री ही माहिती येणार का? असं ट्विट माजी केंद्रीय मंत्री पी. चिंदबरम यांनी केलंय.

P. Chidambaram@PChidambaram_IN

हमने विदेश मंत्रालय द्वारा जारी किया गया आधिकारिक बयान देखा। एक आर्मी व्हाट्सएप ग्रुप कि आज 12.52 बजे की खबर के बाद इसमें कुछ भी नया नहीं है।
देश, रक्षा मंत्रालय या सेना मुख्यालय से आधिकारिक बयान की प्रतीक्षा कर रहा है। क्या यह आज रात आएगा?1,583Twitter Ads info and privacy456 people are talking about this
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय लष्कर आणि चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी रात्री ही झटापट घडून आली. चीनने भारताने सीमा ओलांडल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष सीमारेषेवर दोन महिन्यांपासून असणारा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून माघार घेतली जात असताना ही घटना घडली.

भारत आणि चीन यांच्यामध्ये ४८८ किलोमीटर लांबीची सीमा रेषा आहे. यातील बहुतांश सीमा विवादित असून, त्यावर चर्चा सुरू आहे. दोन्ही सैन्यामध्ये १९७५ मध्ये अरुणाचल प्रदेशातील तुलुंग ला येथे चकमक झाली होती, त्यात भारताचे चार सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर प्रथमच दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक होऊन त्यात जीवितहानी झाली.

गलवान खोऱ्यासह पूर्व लडाखमधील पॅन्गाँग सरोवर, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मे महिन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहेत. या भागामध्ये भारताकडून रस्त्यांची ६६ कामे सुरू असून, काही धावपट्ट्याही विकसित करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय. या कामांमुळे पॅन्गाँग सरोवर आणि परिसरात भारतीय लष्कराला वेगवान हालचाली करणे शक्य असल्यामुळे या कामांत अडथळे आणण्यासाठी चीनच्या सैन्याकडून या भागात घुसखोरी सुरू असल्याचं समजतंय. लष्करी अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ स्तरावरील चर्चेनंतर तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातच, सोमवारी रात्री ही घटना घडली. रात्री ११.३० नंतर गलवान खोऱ्यामध्ये चीनचे सैनिक ट्रकमधून आले. त्यांना भारतीय सैनिकांनी अडविल्यानंतर ते माघारी जाण्यास तयार नव्हते आणि त्यातूनही घटना घडली. सुमारे दोन ते तीस तास ही चकमक झाल्याचं समजतंय. यानंतर मंगळवारी सकाळी दोन्ही बाजूंच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये घटनास्थळी चर्चा झाली.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती दिली. तसंच, पूर्व लडाखच्या परिस्थितीचा आढावा घेतानाच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांबरोबर बैठक घेतली. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीही आपला पठाणकोटचा नियोजित दौरा रद्द केलाय. चीनच्या लष्कराने तत्काळ या भागातून माघार घ्यावी, यासाठी भारतीय लष्कराकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे तर, भारतीय लष्कराने १५ जूनपासून दोन वेळा सीमोल्लंघन केल्याचा कांगावा चीनकडून करण्यात येत आहे. तसेच, भारतीय सैन्यानेच चीनच्या सैनिकांवर पहिल्यांदा हल्ला केल्याचा कांगावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्याने केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *