बीड

बीड जिल्ह्यात आज 183 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 7302 तर देशात 41383

बीड जिल्ह्यात आज दि 23 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3966 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 183 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3783 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 8 आष्टी 55 बीड 24 धारूर 17 गेवराई 11 केज 12 माजलगाव 5 परळी 3 पाटोदा 11 शिरूर 31 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत

२४ तासांत राज्यात ७ हजार ३०२ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ७ हजार ३०२ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ७ हजार ७५६ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण १२० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 7392 new cases in a day with 7756 patients recovered and 120 deaths today)
आजच्या १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख १६ हजार ५०६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली आली असून ती ९४ हजार १६८ इतकी झाली आहे.

देशात दिवसभरात 41383 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – कोरोनाचा कहर अद्याप देशात कायम असून आज पुन्हा एकदा 40 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 41383 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 507 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 9 हजार लोकांना सध्या कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महामारीच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत तीन कोटी 12 लाख 57 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 18 हजार 987 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3 कोटी 4 लाख 29 हजार रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

1.31 टक्क्यांवर देशाचा मृत्यूदर पोहोचला आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 1.30 टक्के आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगात सातव्या स्थानी पोहोचला आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *