उस्मानाबादसाठी धोक्याची घंटा, आकडा वाढू लागला आजही वाढले 6 रुग्ण

उस्मानाबाद प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हयातील 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 35 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 06 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत .
जिल्ह्यातील आज सहा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उमरगा 2,केसरजवळगा 1, उस्मानाबाद २ आणि परंडा १ असा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता ३५ झाली आहे. पैकी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ३० जण उपचार घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!