बीड जिल्ह्यात आज 156 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 10 हजार कोरोनामुक्त तर देशात 48 हजार नवे रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 26 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3677 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 156 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3521 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 10 आष्टी 36 बीड 17 धारूर 3 गेवराई 24 केज 26 माजलगाव 6 पाटोदा 9,परळी 2 शिरूर 8 वडवणी 15 असे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात १०,१३८ रुग्णांची करोनावर मात
मुंबई: राज्यात काल दिवसभरात नव्या रुग्णाच्या संख्येत काहीशी घट झाली असून गेल्या २४ तासात एकूण ९ हजार ६७७ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याच दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.काल एकूण १० हजार १३८ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, दिवसभरात १५६ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 9677 new cases in a day with 10138 patients recovered and 156 deaths today)
कालच्या १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख ७२ हजार ७९९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २० हजार ७१५ इतकी झाली आहे.
देशात २४ तासांत ४८,६९५ नवीन करोना बाधित रुग्ण
गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची भारतात नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ४८,६९५ नवीन करोना बाधित आढळून आले आहेत. तर १,१८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी २१ जून रोजी ४२,६४० रुग्णांची नोंद झाली होती. तसेच, गेल्या २४ तासात ६४,८१८ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहे. त्यामुळे १७,३०३ सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनार गेल्या २४ तासात ४८ हजार ६९८ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. तर ६४ हजार ८१८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. शुक्रवारी १,१८३ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशात आतापर्यंत ३ कोटी १ लाख ८३ हजार १४३ जणांना करोनाची लागण झाली आहे.
तर २ कोटी ९१ लाख ९३ हजार ८५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आपापर्यंत देशात ३ लाख ९४ हजार ४९३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ५ लाख ९५ हजार ५६५ सक्रिय रुग्ण आहेत.